मुंबई – राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे कार्टून असलेला बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा परमपूज्य (प.पु) असा मार्मिक उल्लेख करत समाचार घेण्यात आल्याचे दिसून आले.
काल अधिवेशनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर विरोधातील आमदारांनी सत्ताधारी आमदारांकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सभागृहात वातावरण चांगलं गरम झाल्याचे दिसून आले. आज शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून थेट आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करण्यात आली.
बॅनरवरून आदित्य ठाकरेंवर निशाणा
युवराजांची नेहमीच दिशा चुकली,महाराष्ट्राचे परमपूज्य (प.पू ) असा उल्लेख बॅनरवर करत आदित्य टकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच २०१४ मध्ये खुडचिसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असे देखील या बॅनरवर लिहिण्यात आले. घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली,पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन आणि स्वत: आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असा घणाघात देखील यावेळी विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर बॅनरबाजीतून केला आहे.