Maharashtra Assembly Elections । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती सज्ज झाल्या आहेत. प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील मैदानात उतरले आहेत. या सर्व घडामोडीत याच निवडणुकीचा नेमका काय निकाल लागणार यांचा एक सर्व्हे समोर आला आहे. IANS-Matrize चा हा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या विभागात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“…175 पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न” Maharashtra Assembly Elections ।
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले असता त्यांना या सर्व्हेबाबत विचारण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही राहिलेल्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे आणि 175 पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता कुठून कुठून काय सर्व्हे करतील Maharashtra Assembly Elections ।
तर सर्व्हेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “सर्व्हे कोणाचे येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही. लोकसभेला सर्व्हे आले होते. महाविकास आघाडीला दहा जागा मिळणार नाही. पण, आम्ही 31 जागा जिंकलो. आता कुठून कुठून काय सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील मतदार जागृत आहेत. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळत आहेत. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पैशाचे वाटप, ईव्हीएमचा विषय हरियाणाच्या निवडणुकीत आला होता. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा आताचे सरकार येणार नाही. मोदी-शाह यांच्या कृपेने बसलेले हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
IANS-Matrize च्या सर्व्हे
‘आयएएनएस’च्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्व म्हणजे 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची बाजू भक्कम दिसत आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 145 ते 165 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, राज्यात कोणाला किती जागा मिळणार आणि कुणाचे सरकार येणार? याचे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
विधानसभेसाठी IANS-Matrize चा सर्व्हे समोर ; राज्यात कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार ? वाचा सविस्तर