पंतप्रधान मोदींच्या आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये प्रचार सभा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील जाहीर सभांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे, त्यासाठी सभांचा धडाका लावल्याचे पहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढतींचे चित्र दिसत आहे. मोदींची पहिली सभा १३ ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाली. आज अकोला, परतूर(जालना), पनवेल(नवी मुंबई) या ठिकाणी मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत.

दरम्यान, साताऱयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तेथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी येथे भाजप उमेदवार उदयनराजे यांचाही प्रचार करणार आहेत. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार आहेत. उद्या परळी (बीड), सातारा, पुणे येथे मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत.

पंतप्रधान मोदींची शेवटची प्रचार सभा मतदानाच्या दोन दिवस आधी १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप १६४ जागांवर तर, शिवसेना १२४ जागांवर लढत आहेत. १९ ऑक्टोबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होईल. २४ ऑक्टोबला मतमोजणी आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यात भाजपने १२२ आणि शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.