मुंबई – मुंबई डबेवाला संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी ही घोषणा केली आहे. डबेवाल्यांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर होतोय, राजकीय पक्षाला पाठिंबा दिला जात आहे. डबेवाला संघटनेचा आजवर कुणाला पाठिंबा नव्हता, पण आज आम्ही महायुतीला जाहीर पाठिंबा देत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी मुके यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ते मविआला पाठिंबा देत आहेत. मुंबईत डबेवाल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, ते ज्यांना पाठींबा देताना त्यांना विजयात फायदा होतो असा आजवरचा इतिहास आहे.