मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंब मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमधील काही गावांना प्रचारानिमित्त भेटी देत आहेत. त्यापैकी ढाकाळे येथील गावकऱ्यांसमोर भाषण करताना अजित पवारांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायला उशी झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भाषणाला सुरुवात केली. “उद्याच्या निवडणुकीत घडाळ्याच्या शेजारचं बटन दाबण्याचे पवित्र काम बारामतीकरांनी करावं ही विनंती करतो. अजित पवारांनी यावेळेस आपण साहेबांना म्हणजेच शरद पवारांना सोडलेलं नाही असं विधान केलं.
मतदारांना केले आवाहन
“घरातून दोन उमेदवार असल्याने तुमची पंचायत झाली आहे. मी पण कामाचा माणूस आणि साहेब ही दैवत असं झालं. लोकसभेला साहेबांना मतदान दिलं. आता मला विधानसभेला मत द्या. माझी खूपच गंमत केली न सांगितलेलं बरं! मेहरबानी करा. गावोगावी गावच्या पुढा-यांवर नाराजी खूप आहे.
गावक-यांनी काही नोकरीसंदर्भात प्रश्न मांडले. कारखान्यात सभासद नसणा-या गावातील लोकांची नोकर भरती केली जात आहे. आमदाराचं काय काम असतं? तुम्हाला सुविधा पुरवणं, सेवा देणं पण निवडणूक आली की असा मुद्दा काढायचा आणि कात्रित पकडायचं हे मी मान्य करतो,” असं अजित वपार म्हणाले.