मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यातील प्रचाराची रंगत वाढणार आहे. ते आठवडाभराच्या कालावधीत ९ सभा घेणार आहेत. पुण्यात १२ नोव्हेंबरला होणारा रोड शो मोदींच्या प्रचार दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
भाजपच्या प्रदेश शाखेने गुरूवारी मोदींच्या प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, विधानसभा निवडणूक काळातील मोदींची पहिली सभा आज (शुक्रवार) धुळ्यात होईल. त्यासाठी दुपारी १२ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ दुपारी २ वाजता नाशिकमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदींच्या शनिवारी अकोला आणि नांदेडमध्ये सभा होतील. त्यानंतर १२ नोव्हेंबरला त्यांच्या चिमूर (चंद्रपूर) आणि सोलापूरमध्ये सभा निश्चित झाल्या आहेत. त्याच दिवशी सायंकाळी ते पुण्यातील रोड शोमध्ये सहभागी होतील. मोदींच्या १४ नोव्हेंबरला एकाच दिवशी २ ठिकाणी सभा होतील. त्या सभा छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईत आयेाजित करण्यात आल्या आहेत. मोदी आणि इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांमुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहचेल.