Jitendra Awhad : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.
कळवा -मुंब्रा मतदारसंघातील हिंदी भाषिक सेलचे पदाधिकारी पंकज पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कळवा -मुंब्र्यातील पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.