Laxman Hake On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज (रविवारी) इच्छुक उमेदवारांची अंतरवली सराटी येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर मराठवाड्यातील काही जागांवर उमेदवार देण्याचे त्यांनी निश्चित केले असून आता ते उमेदवारही जाहीर करणार आहेत.
जरांगे यांच्या या भूमिकेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाके म्हणाले, मनोज जरांगे हे औकातीवर आले आहेत. 130 मतदारसंघामध्ये पाडू, लोळवू, सुपडा साफ करू अशी त्यांची भाषा होती. मात्र, आमदार पाडण्याची भाषा करणारे जरांगे यांना एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके उमेदवार देता आले नाहीत.
बारामती येथून शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना दम दिला असल्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यामुळे जरांगे हे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील उमेदवार देतील असं मला वाटत नाही, असा टोला देखील हाके यांनी जरांगेंना लगावला.
मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार?
1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)
2) परतूर, (जालना जिल्हा)
3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
4) बीड, (बीड जिल्हा)
5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)
6) पाथरी,( परभणी जिल्हा)
7) हदगाव, (जिल्हा नांदेड)
कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?
1) भोकरदन, (जालना जिल्हा)
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)
4) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
5) जिंतूर, (परभणी जिल्हा)
6) औसा-(लातूर जिल्हा)
कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?
1) बदनापूर राखीव जालना जिल्हा
2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर