कोंढवा – कोंढवा बुद्रूक गावच्या ग्रामदैवताचा आर्शिवाद व ग्रामस्थांचा पाठींबा घेवून, अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा) बधे हे हडपसर विधानसभा मतदार संघ निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे (उबाठा) निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळविणारच असा ठाम विश्वास बधे यांना आहे.
हडपसर विधानसभा मतदार संघातील निवडणूकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच, ही निवडणूक अचानक एका नव्या वळणावर पोहचली आहे. कालपर्यंत जे लोक उमेदवारांच्या विजया विषयी अंदाज व्यक्त करत होते, त्यांच्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे (उबाठा) निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष उमेदवार म्हणून गंगाधर (आण्णा) विठ्ठल बधे हे निवडणूक लढवत आहेत. यामुळे या मतदार संघातील निवडणूक सरळ सोपी राहिली नाही तर, ती चुरशीची व अटीतटीची होणार यात शंका नाही.
कोंढवा बुद्रुकमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पहिल्यांदा ग्राम दैवताचा आर्शिवाद व जुन्या जाणत्या लोकांचे आचार विचार घेवूनच, निवडणूक लढण्याचा निर्धार बधे यांनी केला आहे. या बैठकीत गावातील जेष्ठ नागरिक, मित्र मंडळातील सर्व सदस्य, सामाजीक संस्थेचे कार्यकर्ते, भजनी मंडळातील सदस्य व युवक, मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने निवडणूक लढण्यासाठी पाठीबा दिल्याचे बधे यांनी सांगीतले.
यावेळी नागरिकांनी सांगीतले की, नव्वदच्या दशकापासून समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलेले गंगाधर (आण्णा) विठ्ठल बधे, यांनी लोकहितासाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासाठी चार अटीतटीच्या निवडणूका लढविल्या आहेत, पंचायत समिती सदस्य म्हणून ही त्यांची कारकीर्द गाजलेली आहे.त्यामुळे आता हडपसर चा विकास केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
परिवर्तन घडले तरच,मतदारसंघाचा व लोकांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागत नाही. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे एक नीःस्वार्थी व्यक्तीमत्त्व असुन सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे. बधे विजयी होणार यात शंका नाही. याशिवाय हडपसर विधानसभा मतदार संघातील शिवसेना टिकविण्यासाठी रात्रीचा दिवस करु.
– शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक माजी आमदार महादेव बाबर