Maharashtra Assembly Election । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीसह अन्य नेते सहभागी झाले होते. बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका बदललेली दिसत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे ‘लाडकी बहीण’ योजनेवर स्वतंत्रपणे प्रचार करताना दिसून येत आहेत. या दोघांमधील वादात भाजपला मध्यस्थी करावी लागली.
महाराष्ट्र भाजपला ‘या’ सूचना देण्यात आल्या होत्या Maharashtra Assembly Election ।
गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अजित पवार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे भाजप नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावून दोन्ही पक्षांना सांभाळावे, असे जेपी नड्डा म्हणाले. याशिवाय जेपी नड्डा यांनी निवडणुकीदरम्यान बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त करत भाजप नेत्यांना सतर्क राहण्यास सांगितले.
या बैठकीला ‘हे’ नेते उपस्थित Maharashtra Assembly Election ।
जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पक्षाचे प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विधानपरिषद प्रवीण दरेकर फडणवीस यांच्या निवासस्थानी उपस्थित होते .
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबईला भेट देऊन शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील सत्ताधारी महायुतीचा भाग आहेत.
हेही वाचा
मेरठ इमारत दुर्घटना : 10 जणांचा मृत्यू ; 15 नागरिकांना बाहेर काढले, प्राण्यांसाठी बचाव सुरू