अकोला – महाराष्ट्रात करोना संसर्ग धुमाकूळ घालत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. त्यातच विदर्भातील अकोला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामध्ये कोणतीही जीवीत हाणी झाली नसल्याचे सांगण्यात आलं आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आज दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. हा धक्का ३ रिश्टर स्केल एवढा होता. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक १९ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
भूकंपाचे प्रमाण अनुक्रमे २०.७५ आणि ७६.८३ लाँग आणि लाँजीट्यूट असं दाखवलं आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.