नगरमध्ये 7 जूनला महारक्‍तदान शिबीर 

धनेश कोठारी; अहमदनगर मर्चंट्‌स बॅंकेचा शिबिरासाठी पुढाकार 

नगर  -अहमदनगर मर्चंट्‌स बॅंकेच्या विशेष पुढाकाराने येत्या 7 जुनला नगरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक धनेश कोठारी यांनी दिली. नगरमधील विविध सामाजिक संघटना, संस्था यासाठी एकत्र आल्याचे कोठारी यांनी सांगितले.

विविध रक्तपेढींच्या सहकार्याने शहरात चार ठिकाणी सकाळी 9 ते 5 यावेळेत प्रशासनाच्या नियमानुसार सर्व काळजी घेऊन शिबिर होईल. रक्तदान करून मानवतेला प्रमोट करीत करोना योद्धा बनण्याची संधी या शिबिरातून मिळणार असल्याचे कोठारी म्हणाले.

करोनाच्या काळात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आता सुरु झाला आहे. या संकटकाळात रक्ताची गरज असलेल्या अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर शहरातील संघटनानी रक्तदानाचे आवाहन करीत या महारक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. सकल राजस्थानी युवा मंच, जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन ओसवाल युवक संघ, माहेश्वरी युवक मंडळ, दाळमंडई फाऊंडेशन, अहमदनगर सी. ए. शाखा, विश्वेश्वर प्रतिष्ठान केडगाव, निश्‍चय फाऊंडेशन, बीजेएस अहमदनगर, महावीर चषक परिवार, जितो अहमदनगर, जय आनंद महावीर युवक मंडळ, जैन कॉन्फ्रेंस युवा शाखा, जय आनंद फौंडेशन, नगर रायझिंग फौंडेशन, जिनगर युवा मंच, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, महावीर प्रतिष्ठान, विजेता क्रिकेट क्‍लब, अरिहंत युवक मंडळ (सावेडी) जय आनंद मॉर्निंग ग्रुप शिबिरासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती कोठारी यांनी दिली. नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालय, महेश मंगल कार्यालय, महावीर नगर स्थानक, केडगाव स्थानक या चार ठिकाणी रक्तदान शिबिर एकाचवेळी होणार आहे.

एकाचवेळी गर्दी होवू नये, यासाठी रक्तदात्यांनी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्‍यक आहे. नोंदणीनुसार प्रत्येक रक्तदात्याला रक्तदानासाठी यायची वेळ दिली जाईल. त्यातून लॉकडाऊनच्या नियमांचेही पालन होण्यास मदत होईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला मास्क तसेच सॅनिटायझरची भेट देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.