महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जण ताब्यात; शिष्य आनंद गिरी अटकेत

अलाहाबाद : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी राजकीय पक्षांशी संबंधित अर्धा डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, महंत नरेंद्र गिरी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.

महंत नरेंद्र गिरी सोमवारी बाघंबरी मठातील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. ते निरंजनी आखाड्याचे प्रमुखही होते. अ. भा. आखाडा परिषद ही देशातील सर्व संतांची सर्वात मोठी संघटना आहे.

महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीत सहा ते सात पानांची सुसाइड नोट सापडली होती. या नोटमध्ये शिष्य आनंद गिरी याच्यामुळे महंत तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आता महंत यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात वाद झाला होता. त्याच्या मृत्यूला या वादाशी जोडून पोलिसही तपास करत आहेत.तर महंत नरेंद्र गिरी यांचा सुरक्षारक्षक गणर याची देखील चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांना मोबाईलचा कॉल अहवाल प्राप्त झाला आहे, ज्यात अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. तसेच पोलिसांना महंत यांच्या मृत्यूबाबत एक व्हिडीओही मिळाला आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या 6 ते 10 तासांपूर्वी ज्यांनी महंत यांच्याशी संभाषण केले आहे त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.