पुणे :- विद्येची देवता व सर्व कलांचा अधिपतीअसलेल्या मार्केट यार्डातील श्री शारदा गजाननास कथा, कांदबऱ्या, कविता, आत्मचरित्रपर शेकडो पुस्तकांच्या रुपात बुधवारी (दि. २७) महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी धनंजय भोसले यांनी ही पुस्तके मंडळास भेट म्हणून दिली.
धनंजय भोसले म्हणाले, साहित्य ही एक अशी कला आहे, ज्याने मानवी जीवन अतिशय सुंदर आणि समृध्द होते. माणूस बनणयासाठी आवश्यक गोष्टी साहित्यातून मिळतात. साहित्यातील लेखन ही त्या त्या काळाची अभिव्यक्ती आहे. लेखनातूनच इतिहास मांडला जातो आणि सांगितला जातो. प्रत्येक काळाचा प्रवक्ता हा साहित्य असतो. त्यामुळे मंडळाला ही पुस्तके भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले म्हणाले, लहानग्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी बुध्दीची देवता गणेशाला महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शहरातील गरजू आणि ग्रामीण भागातील मुलांना ही पुस्तके देण्यात येतील असेही भोसले यांनी नमूद केले.
यावेळी, संस्थापक अध्यक्ष गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, गणेश यादव, गणेश झेंडे, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, सचिव राजू पठारे, व्यवस्थापक राजेश मोहोळ, विशाल केकाणे, शुभम हिंगे, केतन कांदे, बबलु बागवान, कृष्णा नांगडे आदी उपस्थित होते.