संपत्ती वाढवण्यासाठीच “महामिलावट’मंडळींनी सत्ता वपरली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांवर जोरदार हल्ला

भादोही – “महामिलावट’ मधील मंडळींनी सत्तेचा वापर केवळ अपली संपत्ती वाढवण्यासाठीच केला आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्य आघाडीवर जोरदार टीका केली. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलाच्या “महाआघाडी’ला मोदींनी नेहमीप्रमाणे “महमिलावट’ असे संबोधून या पक्षाचे लोक नेहमीच घोटाळ्यांमध्ये सहभागी असतात. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात. मात्र भाजपने सत्तेचा वापर जनतेच्या सेवेसाठीच केला असल्याचे मोदी म्हणाले.

जेंव्हा विरोधक सत्तेमध्ये होते तेंव्हा त्यांनी उत्तर प्रदेशात ऍम्ब्युलन्स आणि एनआरएचएम घोटाळा केला होता. दुसरीकडे भाजप सत्तेवर आल्यावर जनतेला आयुष्मान भारत आणि जनऔषधी स्टोअर सारख्या कल्याणकारी योजना दिल्या. विरोधकांनी धर्माच्या आधारे वीजवितरणात भेदभाव केला. मात्र भाजपने उत्तर प्रदेशात 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विरोधकांनी गरीबांना घरांचे वाटप करतानाही मतपेढीचा विचार केला. तर भाजपने “सबका साथ, सबका विकास’ हा मंत्रच मनात कायम ठेवला. विरोधकांनी कोळशाचा घोटाळा केला, तर भाजपने गरिबांना मोफत गॅस जोडणी दिली. सरकारी नोकऱ्यांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी क आणि ड श्रेणीतील भरतीसाठीही भाजप सरकारने मुलाखती घ्यायला सुरुवाती केल्या. तर विरोधकांनी भरतीमध्ये घोटाळा करून युवकांची फसवणूक केली, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात विरोधकांचे सरकार होते, तेंव्हा कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती. मात्र भाजपच्या काळात गुन्हेगारांचे जामीन रद्द होऊन त्यांची रवानगी तुरुंगात व्हायला लागली आहे. चौकीदार जागा असल्यामुळेच

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.