महामिलावटी आघाडीला जनता म्हणतीये ‘बहुत हुआ’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

रतलाम – लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा येत्या रविवारी 19 मे रोजी पार पडणार असून देशभरातील प्रमुख नेतेमंडळी आपापल्या लोकसभा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील रतलाम येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना विरोधी पक्षांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी शीख दंगली प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “हुआ तो हुआ” असं वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. सॅम पित्रोदा यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर निशाणा साधला असून ते म्हणाले, “महामिलावटी आघाडीतील लोक म्हणतात “हुआ तो हुआ” मात्र आता देशातील जनता त्यांना “बहुत हुआ” असं म्हणू लागली आहे.”

तत्पूर्वी सॅम पित्रोदा यांच्या शीख दंगली प्रकरणाबाबतच्या, “हुआ तो हुआ” वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलीच कान उघाडणी केली असून सॅम पित्रोदा यांचे हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.