महाळुगे इंगळे- महाळुंगे /सावरदरी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा गौरव राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सन 2020 जून अखेरमध्ये संस्थेचे माजी चेअरमन रवींद्र गाढवे आणि तसेच सन 2021 जून अखेरमध्ये माजी चेअरमन विलासराव शिवळे पाटील यांच्या कालावधीमध्ये संस्थेचे कर्ज 100 टक्के वसुली करण्यात शेतकरी तसेच बाजार समिती सभापती व सोसायटी संचालक चंद्रकांतदादा इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून यश आले.
याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी विशेष कौतुक केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला पानसरे आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते सोसायटी पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांच्या नेतृत्त्वात सोसायटीचे उत्कृष्ट कामकाज सुरू आहे.