महालक्ष्मी एक्सप्रेस: प्रवाशांसाठी ‘कल्याण-कोल्हापूर’ 19 डब्यांची विशेष ट्रेन

मुंबई – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले असून, सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रवाशांना सुखरूप घराकडे रवाना करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून कल्याणहून कोल्हापूरकडे 19 डब्यांची विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.

रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 37 डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 14 बस आणि 3 टेम्पोच्या सहाय्याने प्रवाशांना सह्याद्री मंगल कार्यालय येथे पाठविण्यात येत असून याठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.