सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका; मुख्यमंत्र्यांनी मानले बचाव पथकांचे आभार

मुंबई – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या २००० प्रवाशांची तब्ब्ल १७ तासानंतर सुटका करण्यात आली आहे. डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. पुरात अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले असून, सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी ट्विटर वरून सर्वांचे आभार मानले आहेत.

“महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. एनडीआरएफ, भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल, रेल्वे, पोलिस, स्थानिक प्रशासन या सर्वांनी एकत्र येऊन, समन्वयाने अतिशय कौशल्याने हे अभियान राबविले आणि सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या अभियानात सहभागी सर्वांचा मी अतिशय आभारी आहे आणि त्यांचे अभिनंदनही करतो”. असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.