नवी दिल्ली – देशभरामध्ये आज 74 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे सध्या देशात आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला.
दरम्यान, यावेळी चित्ररथावर ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ साकारण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती पाहण्यास मिळाली.