‘करोना असला तरी महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन झालेच पाहिजे’

अलाहाबाद – करोनाच्या साथीच्या दुसऱ्या टप्प्याचा कहर सुरू असतानाच उद्यापासून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या कुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हरिद्वार आणि अलाहाबादमध्ये प्रशासन करोना प्रतिबंधात्मक उपायांना वेग दिला आहे. करोनाची चाचणी आणि उत्तराखंडमध्ये प्रवेशबंदी यासह विविध उपाय योजना करण्यात आली आहेत.  याच संदर्भात सोशलवर करोना कालावधीमध्येही महाकुंभचे आयोजन करणं योग्य की अयोग्य अशी चर्चा सुरु झाली यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी करोना कालावधीमध्येही महाकुंभचे आयोजन करणं बरोबर असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले तीरथ सिंह रावत,“ करोना असला तरी कुंभचे भव्यदिव्य आयोजन केलं पाहिजे  कारण, महाकुंभ मेळावा दरवर्षी येत नाही फक्त, १२ वर्षातून एकदा येतो. बाकी इतर जत्रा  प्रत्येक वर्षी होतातच, मात्र महाकुंभ मेळावा हा हरिद्वार तसेच बनारस आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे”

दरम्यान,कुंभमेळ्याच्या जागी दररोज 50 हजार करोना चाचण्या घेण्याचे आदेश उत्तराखंड उच्च न्यायलयाने दिले आहेत. या शिवाय फिरती वैद्यकीय सुविधा तैनात करण्यात यावी. पार्किंग आणि घाटावर पात्र वैद्यकीय पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्राने दिलेल्या आदर्श आचर संहितेचे काटेकोर पालन करावे. त्याचा अहवाल 13  एप्रिलपर्यंत उच्च न्यायलयात सादर करावा.

एका आश्रमात 32 जणांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यावर उत्तराखंड सरकारने एक एप्रिलपासून सुधारीत आचारसंहिता जारी केली आहे. त्यानुसार बाहेरून येणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. स्थानिकांना मात्र यातून वगळले आहे. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.