‘महाकुंभमेळावा म्हणजे करोना सुपर स्प्रेडर होय’

रिचा चड्ढाने ट्वीट करत कुंभमेळ्यावर केली टीका

हरिद्वार – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला होता. यातच मिळलेल्या माहितीनुसार, या  महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.


यावर आता अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत  कुंभमेळ्यातीली तुफान गर्दीवर टीका केली आहे. हे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तिने ‘हा कार्यक्रम करोना सुपर स्प्रेडर आहे’ असे म्हटले आहे. तिच्या या व्हिडियोला अनेक युजर्सने  रिचाच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत तुझे अगदी बरोबर आहे असे म्हटले.

दरम्यान,महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमधील लोकांना हरिद्वार प्रवेशासाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी, RT-PCR निगेटिव्ह चाचणी 72 तास आधीची असावी. जर एखाद्या व्यक्तीकडे आरटी-पीसीआर चाचणी अहवाल 72 तासांपेक्षा जुना नसेल, तर त्याला / तिला हरिद्वारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.