रोहित शेट्टी सध्या “सर्कस’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. यात रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारत आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून यात रणवीर सिंह डबल रोल साकारत आहे.
यासोबतच रोहित हा “खतरों के खिलाडी’ या शोचे होस्ट करत आहे. या शोमध्ये रोहित एकदम कडक अंदाजात चाहत्यांसमोर येत असतो. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार सहभागी होत असतात.
या शोमध्ये महक चहलही सहभागी झाली होती आणि ती रोहितवर आपले प्रेम असल्याचे दाखवून देत होती. गतआठवड्यातील एका ऍपिसोडमध्ये महक एका स्टंटची तयारी करत होती.
हा स्टंट सुरू होण्याअगोदर ती जोर-जोरात रोहित सर, आय लव यू असे ओरडत होती. असे तिने अनेकवेळा म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, महकचे हे वाक्य ऐकून अन्य कंटेंस्टेंट्सना आश्चर्य वाटले. तसेच महकच्या या कृतीमुळे रोहितही दंग झाला होता.