वळसे पाटील विकासकामांचे महामेरू

अवसरी बुद्रुकचे सरपंच हिले, उपसरपंच हिंगे यांचे वक्‍तव्य

मंचर – विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे आंबेगाव तालुक्‍याच्या विकासकामांचे महामेरू आहेत. विकास काय असतो हे वळसे पाटील यांच्या कार्यकर्तुत्वातून समोर येत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत सातव्यांदा वळसे पाटील यांना आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात आश्‍चर्य वाटेल, अशा प्रचंड बहूमताने निवडून देणार आहोत, अशी ग्वाही अवसरी बुद्रुक येथील सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे यांनी दिली.

अवसरी बुद्रुक येथील आठवडे बाजारात शांताराम हिंगे, सरपंच पवन हिले व उपसरपंच सचिन हिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजारात मतदारांशी व ग्राहकांशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वळसे पाटील हे धुरंधर राजकारणी आहेत. विकास कामे करुन त्यांनी आंबेगाव तालुक्‍याचा “न भूतो न भविष्यती’ असा कायापालट केला आहे. देशात सर्वकृष्ट ठरलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभा करुन शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देवून शेतकरी समाधानी केला आहे. त्याचबरोबर अवसरी खुर्द येथील अभियांत्रिकी महाविद्यालय उभारुन शेतकऱ्यांची मुले इंजिनिअर केली आहेत. दत्तात्रयनगर येथे भव्य द. गो. वळसे पाटील महाविद्यालय उभारुन शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षित करीत आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील जनता ही वळसे पाटील यांच्या पाठीशी भक्‍कम उभी राहणार आहे, अशी ग्वाही आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शांताराम हिंगे यांनी दिली.

यावेळी बाजारकरुंशी साधलेल्या संपर्क अभियानात वळसे पाटील यांचे परिचय पत्रक वाटण्यात आले. यावेळी प्रशांत वाडेकर, अनिल हिंगे, विलास हिंगे, संभाजी हिंगे, प्रशांत हिंगे, बंडू हिंगे, निवृत्ती फल्ले, ठकसेन हिंगे, सोसायटीचे अध्यक्ष कांताराम हिंगे यांनी भाग घेतला. यावेळी बाजारातील ग्राहकांनी आम्ही वळसे पाटील यांच्या विकासकामांना मानणारे बांधव आहोत. वळसे पाटलांशिवाय आमच्या मनात कुणालाही स्थान नाही. वळसे पाटील हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे खरे कैवारी आहेत. त्यांच्या मनात सामान्य माणसाविषयी कळवळा आहे. त्यामुळे पूर्व भागातून त्यांना आम्ही प्रचंड मताधिक्‍याने निवडून देणार आहोत, अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.