Eknath Shinde | शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पुण्यातील सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वी मराठी अभंगांसाठी प्रसिद्ध सरहदच्या शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामगिरीची दखल घेत सरहद संस्थेच्या वतीने हा सन्मान केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.
हेही वाचा: