नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मदतकार्याची पाहणी
अलिबाग( जि.रायगड) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पूर्णपणे ढासळून जमीनदोस्त झाली. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.