मेहबुबांच्या ताफ्यावर तरूणांकडून दगडफेक

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर सोमवारी काही तरूणांनी दगडफेक केली. त्यात मेहबुबा यांना कुठलीही इजा झाली नाही. मात्र, त्यांचा एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. दगडफेकीची घटना दक्षिण काश्‍मीरच्या खिरम भागात घडली. त्यामध्ये मेहबुबांच्या ताफ्यातील एका वाहनाचेही नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी पांगवले. त्यातील काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पीडीपीने 2014 मधील विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी भाजपशी युती केली होती. त्याविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी तरूणांनी दगडफेक केल्याचे समजते. दोन्ही पक्षांमधील युती फार काळ टिकली नाही. भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने युती सरकार कोसळले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.