अर्जुन तपस्येच्या ठिकाणी हिंदी-चिनी भाई-भाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनौपचारिक चर्चेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी सकाळी तमिळनाडूतील चेन्नई येथे दाखल झाले. व्यापार, सीमा प्रश्‍नावरील वाद आणि परस्पर सहकार्य या विषयांवर मल्लपुरम येथे दोन्ही नेत्यात अनौपचारिक शिखर परिषद होईल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग महाबलीपुरममध्ये पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी विशेषत: लुंगीमध्ये दक्षिणेच्या वेशभूषेत दिसले. मोदींनी शी जिनपिंग यांना महाबलीपुरम येथील ऐतिहासिक स्थळ दाखविले आणि त्याबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दुसऱ्या अनौपचारिक शिखर बैठकीसाठी शी जिनपिंग 24 तासांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. तामिळनाडूपासून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या किनारपट्टीच्या ममल्लपुरम शहरात हे शिखर परिषद होणार आहे. चीनच्या फुझियान प्रांताशी व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांमुळे ते महत्त्वपूर्ण आहे.

जिनपिंग बरोबर परराष्ट्रमंत्री वांग यी आणि चीनचे राजनैतिक अधीकारी यांग जियेची हे देखील आले आहेत. यादरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे दोघेही आपल्या समकक्षांशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.