सातारा (प्रतिनिधी)- महाबळेश्वर येथील २३ वर्षीय विद्यार्थी व त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील ३६ वर्षीय युवक अशा दोन जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ११८ झाली आहे.
मूळचा महाबळेश्वर येथील विद्यार्थी मुंबईतून महाबळेश्वरला येत असताना शिरवळ येथेच संशयित म्हणून आढळला. त्याच्या स्त्रावाची तपासणी केल्यावर शनिवारी रात्री त्याचा रिपोर्ट आला. त्यात तो पॉझिटिव्ह निघाला. दुसरा त्रिपुटीचा करोनबाधित पुण्यातून आला होता. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत असून काही जणांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.