उत्तरप्रदेशातील महाआघाडी संधीसाधू – मोदींची टीका

कन्नौज – उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आणि राष्ट्रीय लोकदल, या पक्षात जी आघाडी झाली आहे ती संधीसाधू आघाडी असून या आघाडीने केवळ जातीपातीचेच राजकारण केले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या आघाडीचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे जातपात जपना और जनता का माल अपना, या संधी साधू आघाडीला जनता धडा शिकवेल असा दावाही मोदींनी केला आहे.

येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा दावा केला. विरोधकांची ही आघाडी म्हणजे महामिलावट असल्याची खिल्लीही त्यांनी पुन्हा उडवली. चौकीदार आणि राम भक्तांची टिंगल टवाळी करणे एवढेच या आघाडीचे काम आहे.

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी यावेळीही त्यांची सत्तेची संधी गमावली जाणार आहे असे ते म्हणाले. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रु असलेले बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी हे पक्ष केवळ मोदींना हटवण्यासाठी एकत्र आले आहेत असा आरोप त्यांनी केला. बालाकोट हवाई हल्ल्याचा पुरावा मागणारे आणि बाटला हाऊस चकमक प्रकरणात ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी अश्रु वाहणारे हे नेते आहेत असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.