Maha Kumbh 2025 । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात गुरुवारी आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
पिपा ब्रिज क्रमांक १८ जवळ ही आगीची घटना घडली. आरएएफ, यूपी पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. शंकराचार्य मार्गावरील सेक्टर १८ वरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही आग लागली.
#WATCH | Prayagraj | A fire breaks out in Sector 18, Shankaracharya Marg of Maha Kumbh Mela Kshetra. Fire tenders are at the spot. More detail awaited pic.twitter.com/G4hTeXyRd9
— ANI (@ANI) February 7, 2025
कोणतीही जीवितहानी नाही Maha Kumbh 2025 ।
याविषयी माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने, “आग लागली आणि काही मिनिटांतच ती आटोक्यात आणण्यात आली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. अग्निशमन दलाचे विशेष पथक आग कशामुळे लागली याचा शोध घेणार असल्याचे म्हटले आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने घटनास्थळी घोषणा केली की कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व काही नियंत्रणात आहे. सर्वांनी असेंब्ली पॉईंटवर यावे. आगीनंतर, पोंटून ब्रिज क्रमांक १८ वर भाविकांची गर्दी जमली.
आगीचे कारण अद्याप अस्प्ष्ट Maha Kumbh 2025 ।
सेक्टर १८ मधील ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी मोठ्या संख्येने संत आणि महात्मे राहतात. गेल्या काही दिवसांपासून इथे इतकी गर्दी आहे की तीळ ठेवण्यासाठीही जागा नाही. पोलीस, आरएएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी टीमवर्कच्या माध्यमातून काही ठिकाणी रस्ता अडवला आणि इतर ठिकाणी मार्ग वळवला. अशा परिस्थितीत, कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब होती.