महा चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता; सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबई: महा चक्रीवादळ 5 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ते हळूहळू अशक्त होईल. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल.

पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महा चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच गुजरात आणि महाराष्ट्रात तीन दिवस चक्रीवादळाचा धोका असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ताशी 100 किमी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पावसासाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या धोक्यांपासून मुक्त होण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. चक्रीवादळाचा गुजरात, महाराष्ट्र आणि दमण दीव वर परिणाम होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ भागात नौदलाची जहाजे तैनात करण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.