मॅग्नेटिक स्ट्रीप एटीएम कार्ड होणार बंद

कार्ड विनामूल्य बदलून घेण्याच्या स्टेट बॅंकेच्या सूचना

पुणे – भारतातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांकडे डेबिट कम एटीएम कार्ड असतात. ही कार्ड जुन्या पद्धतीची म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रीपची असतील तर, ती 31 डिसेंबर 2019 पासून बंद होणार आहेत. त्याऐवजी बॅंक अधिक सुरक्षित “ईएमव्ही’ चीप आधारित नवी कार्ड वितरित करीत आहे.

ग्राहकांनी जुनी कार्ड त्यांच्याकडे असतील तर नवी कार्ड विनामूल्य मिळवावीत, असे आवाहन स्टेट बॅंकेने केले आहे. 1 जानेवारी 2020 पासून केवळ नव्या कार्डच्या आधारे व्यवहार करू शकता येणार आहेत. 31 डिसेंबरच्या अगोदर ग्राहकांना हे कार्ड बदलून घ्यावे लागणार आहेत. ग्राहकाचे ज्या शाखेमध्ये खाते आहे त्या शाखेत गेल्यानंतर नव्या कार्डसाठी मागणी केल्यानंतर हे नवे कार्ड मिळू शकेल.

फसवेगिरीला बसणार लगाम
मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डच्या वापरामुळे अनेक फसवेगिरीचे प्रकार उघड झाल्यामुळे ही कार्ड बंद करून ईव्हीएम चीप आधारित कार्ड जारी करण्याचे बॅंकेने ठरविलेले आहे. नवे कार्ड सहज उपलब्ध होते आणि त्यासाठी कसलीही किंमत मोजण्याची गरज असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे. नवे कार्ड मिळण्याची सुविधा ऑनलाइन बॅंकिंगच्या माध्यमातूनही उपलब्ध करण्यात आली असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.