पुणे – शहरांतर्गतच आवाक्यातील घरांची गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी “मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व साबळे कन्स्ट्रक्शन” यांच्या संयुक्त विद्ममाने “मधुवन” हा पाच हजारांहून अधिक आवाक्यातील घरांचा प्रकल्प सादर केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशीप) मॉडेल अंतर्गत सर्वाधिक संख्येने घरे उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे.
या प्रकल्पांत वन बीएचकेच्या सदनिका असणार आहेत. रामटेकडी मागे हडपसर-महम्मदवाडी उपगनगर सीमा परिसरात हा प्रकल्प उभा राहतो आहे. पुणे महानगर पालिकेसमवेत “पीपीपी” मॉडेलतंर्गत होत असलेल्या या प्रकल्पांत ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेतील अनुदानाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती “मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व साबळे कन्ट्रक्शन यांच्या वतीने देण्यात आली आहे.
पहिला प्रकारांत पुणे महानगरापालिकेचे लाभार्थी म्हणून घर घेण्यासाठीचे अडीच लाखांचे अनुदान तर दुसऱ्या प्रकारांत प्रथमच घर घेणाऱ्या व्यक्तीस केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेव्दारे मिळणाऱ्या (सीएलएसएस- क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम) 2 लाख 65 हजार रूपयांच्या अनुदानाची सोय उपलब्ध असणार आहे. “मधुवन”च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अगदी पुणे महापालिकेच्या हद्दीमध्येच सर्वसामान्यांच्या आवाक्यातील किंमतीत सर्व सुविधांनी परिपूर्ण असे घर उपलब्ध होणार आहे. दरम्यान पुणे महानगरापालिका लाभार्थींच्या घरखरेदीसाठी महानगरापालिकेच्या सूचना व नियमांप्रमाणे प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आधुनिक जीवनशैलीशी मेळ साधणारी आवाक्यातील घरे ही काळाची मोठी गरज आहे. शहराच्या हद्दीत “मधुवन’ हा प्रकल्प सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातील हक्काच्या घरासह पुणे शहरांतील विविध उपनगरांशी उत्तम कनेक्टिव्हिटी, सर्वोत्तम व परिपूर्ण सोयी-सुविधा व सुरक्षेची काळजी घेणारा हा प्रकल्प असणार आहे.
“मधुवन” प्रकल्पांस मगरपट्टा सिटी, रामटेकडी इंड्रस्ट्रियल एरियासह उंड्री, वानवडी उपनगरांची व कॅम्प भागाची देखील नजीकता लाभली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पुरेसे मैदान, क्लब हाऊस, स्ट्रीट लाईटसह अंतर्गत पक्के रस्ते, सुरक्षा रक्षक अशा सुविधांचा समावेश असून प्रदूषणमुक्त हवेशीर घर, रहिवांशांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी ही या प्रकल्पांची वैशिष्ट्ये असणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाने आवाक्यातील घरांच्या उपलब्धतेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अनेकविध योजना देखील सादर केल्या आहेत. घर खरेदीसाठीच्या मुद्रांक शुल्कात राज्य शासनाने मोठी कपात केली आहे, मालमत्ता किंमतीच्या तुलनेत घरखरेदीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या उपलब्धतेत बॅंकांकडून केली गेलेली वाढ, बॅंकांनी कमी केलेले घरकर्जाचे व्याजदर अशा अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, तसेच पुणे महानगरातील आवाक्यातील घरखरेदीची ही सुवर्णसंधी साधत हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन “मगरपट्टा सिटी ग्रुूप”तर्फे करण्यात आले आहे.