माद्रिद ओपन | कार्लोसचा राफेल नदालशी होणार सामना

माद्रिद – माद्रिद ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत कार्लोस अल्कारझचा सामना दिग्गज राफेल नदालशी होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कार्लोसने ऍड्रियन मन्नारिनोचा 6-4, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली आहे.

विशेष म्हणजे, कार्लोस अल्कारझ हा आपल्या वाढदिवशी म्हणजे 5 मे रोजी मॅजिक बॉक्‍स सेंटर कोर्टवर आपला आदर्श असलेला खेळाडू नदालशी खेळणार आहे.

17 वर्षीय कार्लोस म्हणाला, राफेलसोबत खेळण्याचे माझे स्वप्न आता साकार होताना दिसत आहे. मी लहानपणापासून त्याच्या खेळ पाहात आलो आहे. माझा वाढदिवस त्याच्यासोबत साजरा करणे यापेक्षा दुसरा कोणताही क्षण माझ्यासाठी अनमोल नाही.

या स्पर्धेच्या अन्य सामन्यात डेनियल इवान्सने झेर्मी चार्डीचा 7-6 (6), 6-7 (7), 6-2, तर डॅनिस शापोवालोव्हने डुसान लाजोविचचा 6-1, 6-3 असा पराभव केला. तसेच फॅबियो फोगनिनीने स्पेनिश क्‍वालीफायर कार्लोस टेबर्नरचे आव्हान 7-6 (4), 2-6, 6-3 असे मोडित काढले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.