चेन्नई – कमी कालावधीत लोकप्रिय झालेले टिक-टॉक या ऍप वर बंदी घालण्याचा आदेश आज मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयात टिक-टॉक या ऍपच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मदुराई येथील वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मुथु कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर निकाल देत न्यायमूर्ती एन किरुबाकरन आणि एस एस सुंदर यांनी टिक-टॉक या ऍपमुळे आक्षेपार्ह व्हिडिओचा वापर करणे धोक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हंटले आहे. तसेच हे ऍप वापरणारी लहान मुले लैंगिक अत्याचारांना बळी पडण्याची शक्यता असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच लहान मुलांनी सायबर पीडित बनण्यापासून रोखण्यासाठी अमेरिके प्रमाणे मुलांच्या ऑनलाइन गोपनीयता संरक्षण कायद्यासारखा, भारतात अंमलबजावणी करीता १६ एप्रिल पर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश केंद्र सरकारला न्यायालयाने दिला आहे.
भारतात सध्या या ऍपचे ५५ दशलक्ष वापरकर्ते आहेत.