नवी दिल्ली : मध्यप्रदेशातून भरधाव ट्रकने तीन बसला जोरात टक्का दिल्याने भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात 50 जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने तीन बसला मागून जोराची धडक दिली. या अपघाताविषयी पोलिसांनी माहिती देताना, या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले असून त्यापैकी 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेशमधील रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ट्रकने तीन बसला धडक दिली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले. जखमींवर रीवा आणि सिद्धी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, सतना येथे आयोजित कोल महाकुंभातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमानंतर या बसेस परतत होत्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीनंतर लोक बसमध्ये चढत होते. अपघाताच्या वेळी बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. ट्रकचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.