ग्वालियर – येथे अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. 1999 मध्ये पोलीस फोर्समध्ये भरती झालेले शार्प शूटर उप निरिक्षक मनीष मिश्रा यांच्यावर फुटपाथवरील कचराकुंडीतून अन्न शोधून खाण्याची वेळ आलीय.
मिळालेली माहिती अशी की, 10 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी रात्री 1.30 वाजता डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या बाजूला एक भिकारी थंडीने कुडकुडत असल्याचे दिसले. त्यांनी भिकाऱ्याला जॅकेट आणि बुट दिला. जेव्हा ते तेथून निघाले तेंव्हा भिकाऱ्याने डीएसपी तोमर यांना नाव घेऊन आवाज दिला.
https://twitter.com/Anurag_Dwary/status/1327854497884880896
नाव घेऊन आवाज दिल्याचे पाहून दोघेही चकीत झाले. त्यांनी जवळ जाऊन भिकाऱ्याला निरखून पाहिल्यानंतर तो भिकारी त्यांच्याच बॅचचे उपनिरिक्षक मनीष मिश्रा असल्याचे समजले. मनीष मिश्रा, डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदौरिया हे 1999 मध्ये उप निरिक्षक पदी पोलीस फोर्समध्ये भरती झाले होते.
डीएसपी यांनी खुप वेळ मनीष मिश्रा यांच्यासोबत संवाद साधला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. मात्र, मिश्रा यांनी नकार दिला. शेवटी त्यांनी मिश्रा यांना समाजसेवी संस्थेकडून आश्रमात पाठवले. तेथे आता त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे.
10 नवंबर सुरक्षा व्यवस्था में तैनात डीएसपी रत्नेश सिंह तोमर और विजय भदौरिय सड़क किनारे ठंड से ठिठुर रहे भिखारी को देखते हैं तो एक अधिकारी जूते और दूसरा अपनी जैकेट दे देता है, जैसे ही डीएसपी को नाम से पुकारता है वो शख्स था उनके साथ के बैच का सब इंस्पेक्टर मनीष मिश्रा. pic.twitter.com/QZJnxEoIxR
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) November 15, 2020
मनीष मिश्रा यांचे कुटुंबीय देखील पोलीस फोर्समध्ये आहेत. त्यांचा भाऊ पोलीस निरीक्षक आहे, वडील व काका अतिरिक्त एसपी पदावरून निवृत्त झाले आहेत. 2005 मध्ये ते दतिया जिल्ह्यात कर्तव्यावर होते. त्यानंतर त्यांचे मानसिक संतूलन बिघडले. सुरुवातीले 5 वर्ष ते घरी राहिले. मात्र नंतर त्यांनी घर सोडले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथूनही त्यांनी पलायन केले.