भोपाळ – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ भाजपच्या एका महिला नेत्यावर केलेल्या आक्षेपार्ह्य टिपणीमुळे टीकेचे धनी ठरत आहेत. कमलनाथ यांनी एका जाहीर सभेत बोलताना राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ असा शब्द वापरला होता.
माजी मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या या टीकेवर नाराजी दर्शवली होती. अशातच आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ व काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे.
एका जाहीर सभेमध्ये बोलताना चौहान यांनी, “वयाच्या ७४ व्या वर्षी कमलनाथ यांना एका महिला मंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह्य शब्दांमध्ये टीका करणं शोभत नाही. राहुल गांधी हे दुर्दैवी असल्याचं म्हणत माफी मागत आहेत. मात्र तरीही कमलनाथ म्हणतात मी माफी मागणार नाही.”
“असं वाटतंय की, काँग्रेस अंतर्गत सध्या २-३ काँग्रेस तयार झाल्या आहेत. राहुल गांधींची एक काँग्रेस, सोनिया गांधींची एक अन् कमलनाथांची एक” अशा शब्दांमध्ये कमलनाथ व काँग्रेसचे वाभाडे काढले.
#WATCH: “At 74 he made such remarks against a minister (Kamal Nath’s “item” remark). Rahul Gandhi said it is unfortunate and he is apologising. But Kamal Nath said he won’t apologise. Maybe 2-3 Congress parties have been formed – Sonia ji’s, Rahul ji’s & Kamal Nath’s,” says MP CM pic.twitter.com/NN0e0kwI6z
— ANI (@ANI) October 25, 2020