मध्य प्रदेश – मुसळधार पावसामुळे कारागृहाची भिंत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात २२ कैदी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्य प्रदेशातील भिंडमध्ये घडली आहे. अपघाताच्या वेळी २५५ कैदी बराकमध्ये होते. त्यापैकी २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कारागृह १५० वर्ष जुने आहे.
Madhya Pradesh | Barrack wall of Bhind jail collapsed; 22 inmates injured
This jail is around 150 years old. Barrack 6 was completely destroyed after its wall collapsed. 22 critically injured inmates rescued & sent to hospital. No casualty reported: Manoj Kumar Singh, SP Bhind pic.twitter.com/B6lHSR7taE
— ANI (@ANI) July 31, 2021
कारागृहातील बराक क्रमांक ७ वर ही भिंत कोसळली आहे.अपघाताच्या वेळी एकूण २५५ कैदी होते. या अपघातात २२ कैदी जखमी झाले असून त्यापैकी दोन कैद्यांची प्रकृती गंभीर आहे. या कैद्यांना उपचारासाठी ग्वाल्हेरमध्ये पाठविण्यात आले आहे. हा अपघात पहाटे ५:१० वाजता घडला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
कारागृहातील एका कॉन्स्टेबलने बराक क्रमांक ७ चे प्लास्टर पडत असल्याचे पाहिले. याबाबत लगेत त्या कॉन्स्टेबलने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर येथे कर्मचारी दाखल झाले मात्र बराक उघडण्याची सुरुवात करताच ते पूर्णपणे कोसळले. यानंतर बराक क्रमांक २ च्या भिंतीही कोसळल्या. भिंती कोसळल्याने २२ कैदी त्याखाली दबले गेले. त्यानंतर बाकीच्या कैद्यांना बराक क्रमांक ८ मध्ये हलवण्यात आले. अपघाताच्या वेळी बराक क्रमांक ७ मध्ये ६४ कैदी होते, तर कारागृहात एकूण २५५ कैदी आहेत. अशी माहिती कारागृह अधिक्षक ओपी पांडे यांनी दिली आहे.