Madhya Pradesh: यूपी-बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही नदीच्या पाण्यात मृतदेह, ग्रामस्थांना धक्का

भोपाळ  – उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही नदीच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळले आहेत. मध्य प्रदेशातल्या पन्नामधल्या रुंज नदीत हे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी मात्र मोठा धसका घेतलाय.

पन्ना जिल्ह्यातून वाहणाऱ्या केन नदीला येऊन मिळणाऱ्या रुंज नदीत मृतदेहांचा खच पडलाय. पन्ना जिल्ह्याच्या नंदनपूर गावाजवळ हे मृतदेह किनाऱ्यावर येऊन धडकलेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास सहा मृतदेह आढळून आले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास सहा मृतदेह आढळून आले आहे. या नदीच्या पाण्यात आणखीही मृतदेह असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. गेल्या तीन चार दिवसांपासून मृतदेह सापडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. परंतु, अधिकाऱ्यांकडून मात्र कोणतीही हालचाल झाली नसल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.