माधुरी दीक्षितचे डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करायचे ठरवले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शनद्वारे ती आपल्या डिजीटल कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. स्वतः करण जोहरने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. लाल ड्रेसमधील माधुरीच्या एका फोटोसह त्याने ही माहिती दिली आहे. माधुरी दीक्षितची ही पहिलीच वेबसिरीज असणार आहे. “कलंक’ या मल्टीस्टार सिनेमानंतर माधुरी दीक्षितने कोणत्याच सिनेमात काम केलेले नव्हते.

आता थेट वेबसिरीजच्या माध्यमातून तिने आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायचे ठरवले आहे. वयाची 52 वर्षे गाठलेल्या माधुरीची जादू अजूनही “1,2,3…’ गाण्यातल्या मोहिनीसारखी प्रेक्षकांना मोहिनी घालणारी आहे. या गाण्याला 31 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने माधुरीने अलिकडेच हेच गाणे गुणगुणतानाचा आपला एक व्हिडीओ अलिकडेच सोशल मिडीयावर अपलोड केला होता.

या व्हिडीओला फॅन्सनी दिलेला रिस्पॉन्स खूपच अफलातून होता. त्यामुळे थिएटर असो वा वेबसिरीज, प्रेक्षकांचे प्रेम तिच्या वाट्याला येणार यात करण जोहरला अजिबात शंका नाही. नेटफ्लिक्‍सवर ही वेबसिरीज लवकरच सुरू होणार आहे. मात्र त्याबद्दलचा कोणताच तपशील करण जोहरने दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.