मुंबई-बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत सध्या सोशल मीडियावर फार अॅक्टीव असते. कधी फोटो तर कधी नवेनवे व्हीडियो पोस्ट करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. संपुर्ण भारत त्यांच्या नृत्याचं कौतुक करतात. अभिनयात सुद्धा मास्टर आहे.
मात्र आता लॉकडाऊन सुरु असताना अनेक कलाकार मंडळींनी आपले यू-ट्यूब चॅनेल्स सुरु केले आहेत त्यावर अनेक नवनवीन प्रयोगही ही मंडळी करत असतात. माधुरी दिक्षीतने एक व्हीडियो शेअर केला आहे त्यात त्या शाबुदान्याची खिचडी कशी बनवायची हे चाहत्यांना शिकवताना दिसते आहे.
आपण उपवासाला हा पदार्थ खातो. हे खाताना मला माझ्या आज्जीची आठवण येते, असं तिने डिस्क्रिप्शनमध्ये लिहीलं आहे. आधीच्या व्हीडियोत उकडीचे मोदक शिकवले होते. या नंतरच्या व्हीडियोत नेमका कोणता पदार्थ शिकायला मिळेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.