सोशल मीडिया हे कलाकारांना त्यांचा चित्रपट प्रमोशन किंवा चाहत्यांशी कनेक्ट होण्याचे मोठे माध्यम मानले जाते. या माध्यमाचा वापर करून सेलिब्रिटी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील किंवा प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत सर्व गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात.
नुकतच बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर तिच्या फॅनने केलेल्या एका मागणीवर तिची रिऍक्शन दिली आहे.
एका 13 वर्षाच्या चाहत्याने माधुरीला ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आयुष्यात एकदा तरी भेटण्याची इच्छा प्रकट केली. यासोबतच तिने माधुरीला “क्वीन ऑफ एक्सप्रेशन’चा किताब दिला.
फॅनने ट्विटमध्ये माधुरीला टॅग करत लिहिले आहे की, “माधुरी मॅम, मी तुमची खुप मोठी चाहती आहे. तुम्ही ज्या प्रकारे पडद्यावर अभिनय करतात,स्वतःच्या भावना व्यक्त करतात ते मला खूप आवडते. तुम्ही प्रत्येक भूमिका अगदी सुंदरतेने निभावतात.
ते अगदी कमाल आहे आणि मला तुमचा डान्सदेखील आवडतो. तुम्ही खूप आनंदी राहा. कदाचित मी तुम्हाला भेटू शकले असते.’ आपल्या फॅनच्या पोस्टला रिप्लाय देत माधुरीने लिहिले की, “आशा आहे आपण एक दिवस नक्कीच भेटू’. तसेच रेड हार्ट इमोटिकॉन्स पोस्ट केले आहेत.