Madhurani Prabhulkar : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री ‘मधुराणी प्रभुलकर’ घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अश्यातच प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत अभिनेत्रीचा नेहमीपेक्षा काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. तिच्या मॉडर्न लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे. तसेच काळ्या रंगाचा गॉगलने तिच्या लुकला मॉर्डन टच आलं आहे. मधुराणीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असून, फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत. मधुराणी हे फोटो शेअर करताना ‘रेड अलर्ट’ असं देखील लिहलं आहे. अभिनेत्रीने यापूर्वी देखील तिचे अनेक हटके अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
‘आई कुठे काय करते’ने प्रेक्षकांचा घेतला निरोप :
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला. डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२४ अशी पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष, अभी, यश, अनघा, आरोही, ईशा, अनिश, गौरी, कांचन, अप्पा इ. आणि इतर सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी प्रेम केले, वेळप्रसंगी मालिकेवर जोरदार टीकाही केली.
असे असले तरी मराठी टीव्हीच्या इतिहासात या मालिकेने विविध रेकॉर्ड केले आणि मोडले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकेकाळी अरुंधतीची ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानी होती आणि ३० नोव्हेंबर २०२४ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. इतकी वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर मालिका संपली आहे.