लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर – मधुर भंडारकर

मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर या गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात आहेत. यातच त्यांची  प्रकृतीबाबत  मधुर भंडारकर यांनी इन्स्टाग्रामवर लतादीदींचा फोटो शेअर करत माहिती दिली आहे. मधुर यांनी पोस्ट केली की,’ लता मंगेशकर यांची भेट घेतली सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की त्यांची प्रकृती स्थिर असून त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद’ तत्पूर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन लतादीदींची भेट घेतली होती.

दरम्यान , 90 वर्षीय लतादीदींना काही दिवसांपूर्वी पहाटे श्‍वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने  ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत संसर्ग झाला असल्याने त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्‍वगायिका असणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)