प्रियांका चोप्राच्या गुडन्यूजबाबत मधुचोप्रांचे स्पष्टिकरण

गेल्याच वर्षी जोधपूरमध्ये शाही विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या निक जोनासबरोबर विवाहबद्ध झालेल्या प्रियांका चोप्राबाबत सध्या काही सनसनाटी न्यूज पसरते आहे. प्रियांकाकडे काही “गुड न्यूज’ असल्याची चर्चा व्हायला लागली आहे. सोशल साईटवर प्रियांकाचा “बेबी बम्प’चा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून ही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रियांकाच्या आई मधु चोप्रा यांनीच याबाबत स्पष्टिकरण दिले आहे.

हा फोटो जेंव्हा काढला गेला होता, तेंव्हा प्रियांका खूप दमलेली होती. तिने पोटावर हात ठेवला होता. कॅमेऱ्याच्या अँगलमुळे ती प्रेग्नंट असल्याचा भास व्हायला लागला होता. एवढेच. पीसी इतक्‍यात काही प्लॅनिंग करण्याच्या मूडमध्ये नक्की नाही. मिडीयातील चर्चेबाबत प्रियांकाची रिऍक्‍शन विचारली असता, “गीव्ह मी ए ब्रेक’ अशा एकाच वाक्‍यात तिने आपल्याकडे आता तरी काही “गुड न्यूज’ नाही, हे स्पष्ट केले असल्याचे मधु चोप्रा यांनी सांगितले. प्रियांका आणि निकचे लग्न होऊन अजून जेमतेम 6 महिने होत आहेत. तोपर्यंत त्यांच्याकडे बाळाची चाहुल लागली असल्याचा अंदाज वर्तवणाऱ्या मिडीयावाल्यांना पण काय म्हणावे.

Leave A Reply

Your email address will not be published.