मधुकर टिल्लू यांनी एकपात्री कला रुजवली

विसावा स्मृतिदिन : अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या भावना

पुणे -ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांनी मराठी रंगभूमीवर एकपात्री कला रुजविली. एकपात्रीची नवी पिढी तयार केली. त्यांना 12 तास आपली कला सादर करून एकपात्री कलाकार आदरांजली देत आहेत हे अभिनव आहे, असे मत अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले.

एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने मधुकर टिल्लू यांच्या 20 व्या स्मृतीदिनानिमित्त 20 कलाकारांनी आदरांजली म्हणून ऑनलाइन कार्यक्रम सादर केला. या ऑनलाइन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ रंगकर्मी राघवेंद्र कडकोळ, संस्थेचे अध्यक्ष दीपक रेगे, सचिव नरेंद्र लवाटे, उपक्रम प्रमुख मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते. यावेळी यावेळी एकपात्री, कथाकथन, कथा अभिवाचन, शायरी, पपेट शो, नाट्यप्रवेश, राशींचे किस्से असे विविध कार्यक्रम सादर झाले.

दिलीप हल्ल्याळ, मंजिरी धामणकर, भाग्यश्री देशपांडे, मंजुषा जोशी, सुरेंद्र गुजराथी, पल्लवी पाठक, विजयकुमार कोटस्थाने, चैताली माजगावकर- भंडारी, विश्‍वास पटवर्धन, दीपक रेगे, राहुल भालेराव, अंजली शहा, अंजली कऱ्हाडकर, वंदना आचार्य, स्वाती सुरंगळीकर, कल्पना देशपांडे, भावना प्रसादे, चैताली अभ्यंकर आदी कलाकारांनी कला सादर केली. नरेंद्र लवाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.