Madhya Pradesh | Madhav National Park – राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून तत्वतः मान्यता दिली आहे. यामुळे माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील नववे व्याघ्र प्रकल्प बनणार आहे. आता राज्य सरकारकडून अधिकृत अधिसूचना प्रलंबित आहे.
अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एल कृष्णमूर्ती म्हणाले की, रविवारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन महामंडळाच्या तांत्रिक समितीने माधव राष्ट्रीय उद्यानाला मंजूरी दिली. आता या उद्यानात एक नर आणि एक मादी वाघ सोडण्यासही मंजुरी दिली. मध्य प्रदेश सरकारचा हा संवर्धन उपक्रम माधव आणि कुनो नॅशनल पार्क्समधील वन्यजीव व्यवस्थापन मजबूत करेल, तसेच स्थानिक समुदायांना इकोटूरिझमचे फायदे मिळवून देईल आणि प्रादेशिक विकासात मदत करेल.
प्रस्तावित व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार 1,751 चौरस किलोमीटर असेल, ज्यामध्ये 375-चौरस-किलोमीटर कोर क्षेत्र आणि 1,276-चौरस-किलोमीटर बफर झोन समाविष्ट आहे. हा व्याघ्र प्रकल्प म्हणून माधव राष्ट्रीय उद्यानाचा विकास हा राज्याच्या व्याघ्र संवर्धनासाठी सुरू असलेल्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माधव राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या पुनर्प्रवेशासाठी दबाव आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती आणि उद्यानाचे व्याघ्र प्रकल्पात रूपांतर करण्याची वकिली केली होती. या व्यतिरिक्त, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केंद्र सरकारकडून आवश्यक समर्थन आणि मंजूरी मिळवून उपक्रम यशस्वी करण्यात मदत केली होती. माधव नॅशनल पार्कला भारतातील आघाडीच्या व्याघ्र संवर्धन हॉटस्पॉट्सपैकी एक म्हणून स्थान मिळण्यासाठी स्टेज तयार झाला आहे.
रतापाणी वन्यजीव अभयारण्य हा 8 वा व्याघ्र अभयारण्य असेल. एनटीसीएनी ऑगस्ट 2008 मध्ये रतापाणी वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. रतापाणी क्षेत्राजवळील खाणी चालविणारे राजकीय नेते अधिसूचना रोखत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यानाला मन्यता मिळेल.
काय आहे नव्या व्याघ्र प्रकल्पात?
१. माधव राष्ट्रीय उद्यानाने व्याघ्र संवर्धनात केली लक्षणीय प्रगती
२. यशस्वी प्रजनन कार्यक्रम राबवण्यात पुढाकार
३. सप्टेंबर 2024 मध्ये वाघाच्या बछड्यांचे केले स्वागत
४. वाघांच्या पुनर्स्थापनेच्या प्रयत्नांतले हे मोठे यश
५. उद्यानातील व्याघ्र संवर्धन योग्य मार्गावर
६. आता माधव राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या वाढणार
७. प्रकल्पाचा विस्तार पाच वर्षांत 1,600 चौकिमी
८. पुढील वर्षभरात १०० हेक्टरवर टायगर सफारी होणार