मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मोठी चूक केली आहे. या ट्विटवरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे.
फडणवीसांची मोठी चूक! छत्रपती शाहू महाराजांना संबोधले…
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतिदिनी ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून संबोधले, त्यांनी असे ट्विट केले होते. यामुळे सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली.